एम सी आर
Uncategorized

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

नांदेड:दि (9 मार्च 2026)

AIU National UNIFEST (AIU’s 39th Inter University Youth Festival UNIFEST) दि. १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जीपीआर नगर चेन्नई तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आला आहे. या युवक महोत्सवात स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघातील एकूण सहा कलाप्रकारात भाग घेत आहे. शास्त्रीय सुरवाद्या,फोक आर्केस्ट्रा, आदिवासी दंडार नृत्य, संकल्पना नृत्य, प्रहसन, मूकअभिनय या कलाप्रकार सहभागी होत आहेत. सदरील संघामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्रशिक्षक, संघव्यवस्थापक, संघव्यवस्थापिका वादक, वादक साथीदार तसेच संचालक, विद्यार्थी विकास व विभागातील कर्मचारी संघासोबत रवाना झाले आहेत.
संघासाठी मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, मा. प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन, मा. प्र .कुलसचिव डॉ. पवार डी.डी , वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे , परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारशिंग साबळे , क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने , संचालक डॉ. मारोती गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना,जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम , यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिकलीकार यांच्या नेतृत्वाखाली संघासोबत मार्गदर्शक संघ व्यवस्थापक डॉ. संदीप काळे, डॉ. शिवराज शिंदे ,श्री दिलीप डोंबे ,श्री सिद्धार्थ नागठाणकर, श्री संदेश हटकर, श्री.संकेत गाडेकर, संभा कांबळे व वादक साथीदार रवाना झाले आहेत.

Share

Related posts

पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२६ परीक्षांसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

Chief Editor

अर्थशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन निमित्त भितीपत्रकाचे प्रकाशन

Chief Editor

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

Chief Editor

लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

Chief Editor

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

Leave a Comment