एम सी आर
Uncategorized

ने.सु.बो चा एनसीसी कॅडेट गणेश पिसाळ यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड

नांदेड:

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा एन.सी.सी. छात्र कावलगाव ता.पूर्णा जि. परभणी येथील अंबादास पिसाळ यांचे सुपुत्र गणेश अंबादास पिसाळ यांची भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सी.आर.पी.एफ मध्ये निवड झाली आहे. कॅडेट गणेश पिसाळ हे एका शेतकरी कष्टकरी कुटुंबातून असून त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे. त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे एन.सी.सी अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.बालासाहेब पांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन कॅडेट गणेश पिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालासाहेब पांडे म्हणाले की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र दरवर्षी सातत्याने भारतीय सैनिक दाखल होत आहेत व ते सेवेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच यावेळी एन सी.सी अधिकारी तथा संख्याशास्त्र विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.किशोर इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश आहे त्यामुळे देशाला राष्ट्रप्रेम राष्ट्रहित जोपासणारे तरुणांची गरज आहे. एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांनी कॅडेट गणेश पिसाळ यांच्यासारखे आदर्श समोर ठेवून राष्ट्रहित व राष्ट्रप्रेम जोपासावे. तसेच सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करावे असे आवाहन केले.

या सत्काराला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुग्रीव फड, उपप्रचार्य सौ.कल्पना कदम,प्रा. डॉ.अतिश राठोड तसेच डॉ. पंकज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या निवडीबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, सचिवा ॲड सौ.वनिता ताई जोशी व अन्य मान्यवरांनी कॅडेट गणेश पिसाळ यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय छात्र सैनिक तसेच इतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Related posts

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

प्रा. ज्योत्स्ना गायकवाड वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाचा मान उंचावला; डॉ. सिंकू कुमार सिंग एआययूमध्ये जॉईंट सेक्रेटरी

Chief Editor

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे : ना. हेमंत पाटील

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक नांदेड येथे संपन्न

Chief Editor

Leave a Comment