एम सी आर
Uncategorized

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वारातीम विद्यापीठात वृक्षारोपण उपक्रम संपन्न

नांदेड:

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी व दीर्घकाळ टिकणारी पिंपळ, वड आणि चिंच यांसारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा” हा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
वृक्षारोपण कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मारुती गायकवाड, अधिष्ठता डॉ हरिश्चंद्र पतंगे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने श्री. संदीप चव्हाण (विभागीय वन अधिकारी), श्री. नितीश निगडे (सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी), श्री. गिरीश लखेकर (वनपरिक्षेत्र अधिकारी), श्री. अशोक क्यादरवाड, श्री. सुरेश बळी (वनपाल), श्री. गिरीश कोरडे, श्री. बळवंत शिंदे, श्री. राहुल सोनवणे (वनरक्षक) तसेच डॉ. पतंगे यांनी उपस्थित राहून उपक्रमात सहभाग नोंदविला.
या प्रसंगी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने ‘एक पेड माँ के’ या घोषणाद्वारे किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. पर्यावरण संरक्षणासाठी विद्यापीठाच्या वतीने अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
———————

Share

Related posts

डॉ. शंकररावजी चव्हाण : आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समन्वय साधणारे द्रष्टे लोकनेते

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये डॉ. रंगनाथन जयंती व ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात संपन्न

Chief Editor

तांत्रिक कौशल्य ही काळाची गरज – डॉ. सचिन नरंगले

Chief Editor

राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश! डॉ. संदीप काळे यांचा गौरव संपन्न!

Chief Editor

सुदृढ शरीर व आनंदी जीवनासाठी दररोज व्यायाम आवश्यक : मनीषा जायभाये”

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

Leave a Comment