एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

नांदेड :दिनांक 17 जुलै 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा मंगळवार, दि. १५ जुलै रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा विभागाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेत बहिस्थ शिक्षण विभागाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच परीक्षा विषयक विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभ्यासकेंद्रांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे, प्रवेश प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणे, परीक्षा नियोजन अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे तसेच विद्यापीठाच्या धोरणे व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बहिस्थ शिक्षण विभागामार्फत रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. बदलत्या काळातील कौशल्याधारित शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाचे आहे.”
बहिस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहालानी यांनी विभागाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “बहिस्थ शिक्षण विभाग हा केवळ शैक्षणिक कामकाज करणारा विभाग नसून समाजाभिमुख सेवा देणारा विभाग आहे. शिक्षणाला चार भिंतींच्या मर्यादेत न ठेवता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग सातत्याने करीत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नारायण शिवशेटे व सिमरन प्रेमचंदानी यांनी केले. सदर सहविचार सभा यशस्वी होण्यासाठी बहिस्थ शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक विष्णू भुसारे, सुरेश देशमुख, डेटा ऑपरेटर अजय इंगोले, संकेत साखरे व शिल्पा धनमणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————–

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये वाणिज्य व व्यवस्थापनातील विविध अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Chief Editor

बुद्धिबळ हा खेळ भारतीय बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे -डॉ. सी. आर. बाविस्कर

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – सुरेशदादा गायकवाड

Chief Editor

यशवंत ‘ भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment