एम सी आर
Uncategorized

बोधिसत्त्व नगर वाडी बुद्रुक येथे माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने अजय वसंतराव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

माता रमाई जयंतीनिमित्त व्याख्यान व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड : चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार, बोधिसत्व नगर पब्लिक स्कूलच्या बाजूला, पूर्ण रोड, वाडी बुद्रुक (नांदेड) येथील प्रांगणामध्ये दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजय वसंतराव गव्हाणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके यांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई माता जयंती मंडळाच्या अध्यक्षा पारूबाई हरिभाऊ वाघोळे या राहणार असून, उपाध्यक्ष राजमती श्रीकांत राऊत, कोषाध्यक्ष लताबाई बाबासाहेब सदावर्ते व सचिव सुरेखा सुभाषराव सदावर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.माता रमाई यांच्या कार्य व विचारांचा समाजावर झालेला प्रभाव या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमानंतर अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, तत्काळ शाहिरांच्या बुद्ध-भीम गीतांवर आधारित सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम देखील सादर करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची माहिती जयंती मंडळाचे संयोजक व प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रकाश बगाटे यांनी दिली असून, सर्व नागरिकांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन

Chief Editor

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन

Chief Editor

Leave a Comment