एम सी आर

यशवंत ‘मध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड (दि. १४ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयात २०२४ ते २०२६ या कालावधीमध्ये बी.ए.,बी.कॉम., बी.एससी. व एम.कॉम. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सेलच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यामध्ये टीसीएस, पुणे या नामांकित कंपनी सहभागी झाली होती. कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट व मुलाखत घेण्यात आली. टीसीएस कंपनीच्या वतीने श्री अभिषेक शर्मा (कॅम्पस रिक्रुटमेंट हेड), नेहा गर्जे, ऋतुजा मोहिते, साईश्वर सावंत, रिश्नक खोंड हे प्लेसमेंट अधिकारी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याच्या सुरुवातीला सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अभिषेक शर्मा (कॅम्पस रिक्रुटमेंट हेड), नेहा गर्जे, ऋतुजा मोहिते, साईश्वर सावंत, रिश्नक खोंड या प्लेसमेंट अधिकारी यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयातील विविध विभागाचा थोडक्यात आढावा घेतला व मागील अनेक वर्षांपासून संपन्न होत असलेल्या रोजगार मेळाव्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली तसेच महाविद्यालयातील व परिसरातील अनेक युवक रोजगारांना या रोजगार मेळाव्याचा लाभ झाल्याचे सांगितले.
रोजगार मेळावा संपन्न करण्यासाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा.डॉ. योगेश नकाते, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड प्रा.डॉ.मदन अंभोरे, प्रा. प्रियंका सिसोदिया, श्री साखरे व श्री. अगरोड इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

यशवंत महाविद्यालयात हिंदी पंधरवडा उत्साहात संपन्न

Chief Editor

मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी

Chief Editor

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात मॉडेल सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

प्रतिक्षा बिरादार हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

Chief Editor

यशवंत इमॅजिनेशिया : उत्सव कलांचा!’ कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment