एम सी आर
Uncategorized

अर्धापूर अपघातस्थळी प्रोफेसर. डॉ. विशाल बेलुरेंची देवदूतासारखी मदत; चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी घेतला धाडसी पुढाकार

अर्धापूर (नांदेड) | प्रतिनिधी

नांदेड–हदगाव महामार्गावर अर्धापूर शहराजवळ आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघे जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत प्रा. डॉ. विशाल बेलुरे यांनी दाखवलेली प्रसंगावधानता, धाडस आणि माणुसकी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.भरधाव वेगात असलेली पांढऱ्या-लाल रंगाची मारुती सुझुकी कार (MH-26 AK 4956) अर्धापूर शहरात प्रवेश करत असताना मशिदीसमोरील रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या आणि गाडीतून होणारी इंधन गळती पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.याच वेळी अपघातस्थळाजवळून जात असलेले प्रा. डॉ. विशाल बेलुरे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली दुचाकी थांबवली. कोणत्याही जीवाची पर्वा न करता त्यांनी जवळील मोठ्या दगडाच्या सहाय्याने कारच्या काचा फोडल्या. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
प्रा.विशाल बेलुरे यांनी दोन लहान मुलींना गाडीतून बाहेर काढले. त्यातील एक मुलगी किरकोळ जखमी होती; मात्र दुसरी साधारण दोन ते अडीच वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी अवस्थेत होती. तिच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे ओळखून प्रा. बेलुरे यांनी त्या चिमुकलीला स्वतः छातीशी कवटाळत दुचाकीवरून थेट अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने शासकीय रुग्णवाहिकेद्वारे तिला नांदेड येथे पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. या धाडसी मदतीमुळे चिमुकलीचा जीव वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.अपघातानंतर प्रो.विशाल बेलुरे यांचे जॅकेट, शर्ट, रुमाल आणि मोबाईल रक्ताने पूर्णपणे माखले होते. मात्र “मुलगी व इतर जखमी लवकर बरे व्हावेत, हीच माझी सदिच्छा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. रस्त्यावर सांडलेले ऑइल माती टाकून साफ करण्यात आले, जेणेकरून अन्य अपघात टळतील. प्रोफेसर.डॉ. विशाल बेलुरे यांच्यासह मदतीला धावलेल्या सर्वांनी या प्रसंगी माणुसकीचे जिवंत दर्शन घडवले.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये प्राणिशास्त्र पदवी विभागाचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची शिक्षक संवर्गातून निवड

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

सौ.अनिता रानवळकर यांना मराठी विषयात पीएचडी प्रदान

Chief Editor

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Chief Editor

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Chief Editor

Leave a Comment