एम सी आर
Uncategorized

स्त्रीचे आरोग्य हाच तिच्या आत्मविश्वासाचा पाया : डॉ. उज्वला सदावर्ते

नांदेड: (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र आणि रसायनशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. उज्वला सदावर्ते उपस्थित होत्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. उज्वला सदावर्ते यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या की, स्त्रीचे शारीरिक आरोग्य हा तिच्या आत्मविश्वासाचा पाया असतो. पौगंडावस्था ते रजोनिवृत्तीपर्यंत शरीरात होणारे बदल समजून घेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यायाम आणि संतुलित आहार हा पर्याय नसून जीवनाचा आवश्यक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या बहुआयामी भूमिकांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्त्रीने सर्व नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन स्वतःला स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखले पाहिजे. स्वतःचे छंद जोपासावेत आणि कोणतेही काम ओझे न समजता आनंदी वृत्तीने करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी स्वरचित कविता, गीते आणि भारुड सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. संगीता माकोने यांनी महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. महिलांनी एकमेकींशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशीच स्पर्धा करावी. परस्पर सहकार्य आणि एकजूट हीच महिलांची खरी ताकद असून ती समाजाला सकारात्मक दिशा देणारी ठरते, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन विशेष उपक्रम राबवण्यात आले. काव्य दर्शन या उपक्रमांतर्गत डॉ. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या कवितांच्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच रसायनशास्त्र संकुलातील प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला रसायनशास्त्र संकुलातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
—————————

Share

Related posts

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

थायरॉइड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय | फिटनेस स्टुडिओकडून हमखास मार्गदर्शन: मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Chief Editor

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Chief Editor

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Chief Editor

Leave a Comment