एम सी आर

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Uncategorized

नांदेड :(दि.५ मार्च २०२२६)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वार्षिक युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
ही बोधचिन्ह स्पर्धा डॉ. शंकररावजी चव्हाण क्लस्टर युनिव्हर्सिटी या प्रस्तावित विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांकडून बोधचिन्ह कोणते आणि कसे असावे, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनोभूमिका जाणून घेण्यासाठी दि.२८ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. महोत्सवाचे समन्वयक डॉ. नीरज पांडे आणि स्पर्धेचे समन्वयक डॉ.बी.आर. भोसले तसेच समितीतील सदस्य डॉ. कैलास इंगोले, प्रा. संकेत देलमाडे, प्रा. प्रियंका सिसोदिया आदींनी स्पर्धेचे आयोजन वाचन कट्टा या ठिकाणी केले होते.
स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधील पदवी व पदव्युत्तर वर्गातील एकूण ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेला हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमतनगर येथील कलाशिक्षक ए. पी. सालमोटे परीक्षक म्हणून लाभले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यापैकी तेलंग प्रणिता परमेश्वर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर सोळंकी पूजा रमेश या विद्यार्थिनीने द्वितीय पारितोषिक पटकावले. तिसऱ्या क्रमांकावर आयशा शरवत इरफान मीनहाज खान ही विद्यार्थिनी होती.
माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शनही केले. सहभागी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन मनोबल उंचावले तसेच परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या ए.पी.सालमोटे यांचा यथोचित सन्मान केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास इंगोले यांनी केले तर आभार प्रियंका सिसोदिया यांनी मानले. विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे ग्रंथ स्वरूपात पारितोषिकही देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Chief Editor

जलसंधारणाचे अतुलनीय कार्य श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी केले -प्रा.इंद्रजीत भालेराव

Chief Editor

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

Leave a Comment