एम सी आर
Uncategorized

२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचा जागर आणि जल्लोष

नांदेड:( दि.२१ फेब्रुवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांचे नियोजन आणि मार्गदर्शनानुसार ‘विकसित भारत@२०४७: युवकांची भूमिका’ या विषयावर यशवंत वार्षिक युवक महोत्सव महाविद्यालय परिसरात दि.२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान उत्साह आणि जल्लोषात साजरा होणार आहे.
दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांच्या अध्यक्षतेखाली

उपविभागीय अधिकारी, नांदेड श्री.सचिन खल्लाळ सोहळ्याचे उद्घाटन करणार आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

आणि युवक महोत्सव समन्वयक डॉ.नीरज पांडे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. दुपारी १२:१५ वाजता काव्यवाचन स्पर्धा, दि.२४ फेब्रुवारी रोजी स्टुडन्ट पेपर सादरीकरण, दि. २५ फेब्रुवारी रोजी पोस्टर सादरीकरण, दि. २६ फेब्रुवारी रोजी मॉडेल सादरीकरण, दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता रांगोळी स्पर्धा, सकाळी १० वाजता म्युझिकल कॉन्सर्ट, ११:१५ वाजता देशभक्तीपर गीते, शास्त्रीय व सुगम गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्य संगीताचे संगीतमय सादरीकरण, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता बोधचिन्ह स्पर्धा होणार आहेत.
दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता ॲम्फिथिएटर येथे समारोप सोहळा आणि बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.
तरी या वैचारिक, शैक्षणिक, तंत्रज्ञानात्मक, प्रबोधनात्मक युवक महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. नीरज पांडे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

Share

Related posts

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Chief Editor

जलतरण म्हणजे आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार

Chief Editor

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये वाणिज्य व व्यवस्थापनातील विविध अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

Leave a Comment