एम सी आर

यशवंत ‘ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वन महोत्सव साजरा

Uncategorized

नांदेड, दि. ८ जुलै २०२६ :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘वन महोत्सव सप्ताह’ अंतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम दि. ७ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र- कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी, पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. पद्माराणी राव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के तसेच डॉ. एस. एल. शिंदे, डॉ. सुरेश तेलंग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
डॉ. साईनाथ बिंदगे यांनी, वन महोत्सवाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे, ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले व पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांचे सहकार्य लाभले तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा वन महोत्सव महाविद्यालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share

Related posts

महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी शिवा कांबळे यांची निवड

Chief Editor

कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला* पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कॉ. किरण मोघे गुंफणार पुष्प

Chief Editor

वारी पर्यावरणाची उपक्रमातून अध्यात्म संतवाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Chief Editor

पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल परवीन शेख खलील यांना ‘मुकनायक नॅशनल अवॉर्ड – 2026’ जाहीर

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

Leave a Comment