एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र येथे आज मंगळवार, दि.१४ एप्रिल, २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, सहा.कुलसचिव रामदास पेद्देवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, हरीश पाटील, नारायण गोरे, शिवाजी चांदणे, संदीप लुटे, जालिंदर गायकवाड, व्यंकटराव हंबर्डे, बालाजी शिंदे, तुकाराम हंबर्डे, बाबुराव हंबर्डे, रामदास खोकले, बंडू कांबळे, संभा कांबळे, प्रदीप बीडला, शशिकांत लोहबंधे, जनार्धन गोवंदे, संभाजी धनमने, बबन हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
——————————-
Share

Related posts

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

मालमत्तेच्या वादातून जीवघेणा हल्ला; पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप

Chief Editor

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धा:महाराष्ट्रातील चार विद्यापीठ पात्रता फेरीत दाखल

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

Chief Editor

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

Chief Editor

Leave a Comment