एम सी आर
Uncategorized

यशवंत वार्षिक युवक महोत्सव अंतर्गत पेपर सादरीकरण स्पर्धा संपन्न

नांदेड: (दि. २५ फेब्रुवारी २०२६):
यशवंत वार्षिक युवा महोत्सव अंतर्गत विद्यार्थी पेपर सादरीकरण स्पर्धा माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे नियोजन आणि मार्गदर्शनानुसार दि. २४ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाली. ‘विकसित भारत-२०४७: युवकांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पेपर सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. एम. एम. व्ही. बेग, सदस्य डॉ. पी. आर. मुठे, डॉ. एस. एम. बिंदगे, डॉ. पी. आर. चिकटे, डॉ. एन. बी. गव्हाणे, प्रा. पी. पी. सिसोदिया, डॉ. मोहम्मद आमेर, प्रा. एस. एस. मावसकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी व्ही. जी. अडबलवार, विठ्ठल सुरनर, डी. आर. टरके व चंद्रकांत मोरे यांनी सहकार्य केले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते तर समन्वयक डॉ. एन. ए. पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील डॉ. नीलकंठराव पाटील, राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथील डॉ. दत्ता मेहेत्रे, पीपल्स महाविद्यालयातील डॉ. मनीषासिंह गहलोत, नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयातील प्रा. सारिका मधुकर लहाणकर, मधुकरराव पाटील खतगावकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर येथील डॉ. हेमंत बक्षी आणि इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील डॉ. डी. बी. कदम उपस्थित होते.
उद्घाटकीय मनोगतात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी तत्कालीन विषयावर सर्वांगीण माहिती घेऊन ती शोधनिबंधाच्या स्वरूपात उपस्थितासमोर मांडणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी विकसित होईल. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी लेखन, वाचन आणि शोधनिबंधाचे सादरीकरण हे महत्त्वाचे तत्व असल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. एम. एम. व्ही. बेग यांनी, वार्षिक युवा महोत्सव व विद्यार्थी सादरीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले.
ई-लर्निंग सेंटर येथे विज्ञान शाखेतील पदवी विद्यार्थ्यांची सादरीकरणे डॉ.पी.आर.चिकटे व प्रा.एन.बी.गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. परीक्षक म्हणून डॉ. हेमंत बक्षी यांनी काम पाहिले. या सत्रात ५८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
रसायनशास्त्र विभागातील स्मार्ट क्लासरूममध्ये पदव्युत्तर व पीएच.डी. विज्ञान विद्यार्थ्यांची सादरीकरणे डॉ. एस. एस. मावसकर यांच्या समन्वयाखाली झाली. डॉ. डी. बी. कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या सत्रात २८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
वाणिज्य विभागातील आयसीटी कक्ष येथे पदवी व पदव्युत्तर वाणिज्य विद्यार्थ्यांची सादरीकरणे डॉ. मोहम्मद आमेर व प्रा.प्रियांका सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. परीक्षक म्हणून डॉ. नीलकंठराव पाटील व सौ. सारिका लहाणकर यांनी काम पाहिले. एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अर्थशास्त्र विभागातील आयसीटी कक्ष येथे कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची सादरीकरणे डॉ. पी. आर. मुठे व डॉ. साईनाथ बिंदगे यांच्या देखरेखीखाली पार पडली. डॉ. दत्ता मेहेत्रे व डॉ. मनीषासिंह गहलोत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या सत्रात २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणे केली असून परीक्षक व प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरांमुळे कार्यक्रमाला शैक्षणिक समृद्धी लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वारातीम विद्यापीठात वृक्षारोपण उपक्रम संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठातील चंपत हंबर्डे यांचे निधन; विद्यापीठात श्रद्धांजली सभा

Chief Editor

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ: भूशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची भरारी;स्पर्धा परीक्षा व संशोधन क्षेत्रात यशाचा डंका

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

Leave a Comment