एम सी आर

शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल -डॉ.अजय गव्हाणे

Uncategorized

(दि. १५ ऑगस्ट २०२६)
शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे. राज्याने, समाजाने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करावा. शिक्षणातूनच सुसंस्कारित, नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय भान असलेला राष्ट्रभक्त माणूस तयार होत असतो. शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत आणि माजी विद्यार्थी गौरव सोहळ्यादरम्यान दि. १४ ऑगस्ट रोजी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या उपाध्यक्ष अँड. मानसीताई हाके, प्रमुख अतिथी संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई हाके, प्राचार्य डॉ. मीनाक्षी पांडे, डॉ.राहुल वाघमारे, प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके, प्राचार्य डॉ.सोपान आंधळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.गव्हाणे म्हणाले की, आज मोबाईलवर बंदी आणण्याची वेळ आलेली आहे, मोबाईलमुळे वाहनांचे वाढते अपघात, सेल्फीमुळे मृत्यू वारंवार घडत आहेत. मोबाईलचा शैक्षणिक, संशोधकीय वापर होण्याऐवजी गैरवापराचे प्रमाण वाढत चालले आहे. मानवी नातेसंबंध उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.
याप्रसंगी डॉ. राहुल वाघमारे आणि प्राचार्य मीनाक्षी पांडे यांचे यथोचित भाषणे झाली. प्राचार्य रेखाताई हाके यांनी विद्यार्थ्यांच्या अनियमित उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप अँड. मानसीताई हाके यांनी केला.
सूत्रसंचालन प्रा. मेघा सातपुते यांनी केले तर शेवटी आभार डॉ. सोपान आंधळे यांनी मानले. या प्रसंगी अर्पिता रेड्डी, कल्पना खंदारे यांची देखील मनोगते झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी गायकवाड, प्रा. शिंदे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

पुन्हा हवेत महात्मा गांधीजी : डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

प्रा. नारायण मोटे : सत्शील, प्रामाणिक व मृदू स्वभाव

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Chief Editor

महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते भित्तिपत्रका चे विमोचन

Chief Editor

Leave a Comment