एम सी आर

स्वारातीम विद्यापीठात जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Uncategorized

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आज सोमवार, दि.१२ जानेवारी, २०२६ रोजी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. पराग भालचंद्र, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
————————————–

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

Chief Editor

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार, राहुल जिनिंगसमोरील घटना

Chief Editor

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क नांदेड जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

Chief Editor

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

Chief Editor

Leave a Comment