एम सी आर
Uncategorized

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंद सांस्कृतिक महोत्सव ‘क्षितिज -2026’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख स्नेहा लांडगे, उद्योजक प्रशांत जगताप, फिटनेस ट्रेनर अलीम सर, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाळ पवार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ गणेश तोलसरवाड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय हट्टे, जय हिंद ज्युनिअर कॉलेजच्या मनोरमा शास्त्री, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव,राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी या स्नेहसंमेलनात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कऱण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारेव्यासपीठ आहे.आपल्या सुप्त गुणांना प्रदर्शित करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अशा स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानी मोठया संख्येने सहभागी झाले पाहिजे.अभ्यास तर महत्वाचा आहेसच पण आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाठी ही स्नेहसंमेलने महत्वाची ठरतात. या कार्यक्रमातून उद्याचा मोठा कलावंत निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणाले.
सदरील स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लावणी, हिंदी गीत रिमिक्स, लोकगीत, कोळीगीत अशा एका पेक्षा एक सरस गीतावर आपली कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकत उत्साह शिंगेला पोहचवला. तर विद्यार्थ्याचा सर्वात आवडीचा व आकर्षक असा शेलापागोटे हा कार्यक्रम देखील संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे, प्रा.नम्रता कुलकर्णी, प्रा. ज्योती पांडे यांनी केले तर आभार प्रा.राहुल पुंडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालायातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना

Chief Editor

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्ट

Chief Editor

चढया दराने खताची विक्री केल्याने* *देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Chief Editor

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

Chief Editor

न्यायालयीन आदेशांच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी उद्या पासून आमरण उपोषण

Chief Editor

Leave a Comment