एम सी आर
Uncategorized

विद्यार्थ्यांमध्ये क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करत रोजगाराची संधी देणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळानी तयार करणे काळाची गरज. – डॉ.डी.एन.मोरे.

परभणी:
दि. 30/3/26 सोमवार रोजी परभणी येथे समाजशास्त्र, संगित, इंग्रजी विषयाची विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न.
आज जग अनेक अर्थाने बदलत आहे. ज्ञान हे जगाच्या प्रगतीचे केंद्र असून , ज्ञानाच्या सहाय्याने समस्यांच आकलन करणारा अभ्यासू विद्यार्थी त्याआधारे घडत असतो. लोकजीवनात सकारात्मक बदल घडविणारा अभ्यासक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने सुजाण समाज घडत असतो.नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांनं मधील क्षमतांना ओळखत विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच अनेकविध नाविण्यपूर्ण संधी देणारा रास्तमाग निर्माण करणारा अभ्यासक्रम बनवताना काळाची गरज ओळखून रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर अभ्यास मंडळाने भर द्यावा.शिक्षकाने त्याला परिपूर्णता द्यावी असा आशावाद कार्यशाळेत बीजभाषक नविन शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक डॉ.डी.एन.मोरे यांनी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड आणि कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी , समाजशास्त्र आणि संगीत विषयाच्या बी.ए. तृतीय वर्ष नविन अभ्यासक्रम प्रभावी आणि परिणाम कारक राबविण्यासाठी आयोजित विद्यापीठ स्तरीय बी.ए.तृतीय वर्ष अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बीजभाषक डॉ.डी.एन.मोरे (सदस्य, व्यवस्थापन परिषद, स्वारातीम विद्यापीठ,नांदेड.) बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजयराव जामकर (सचिव, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी ) तर उदघाटक डॉ.रोहिदास नितोंडे (अध्यक्ष, इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ स्वारातीम विद्यापीठ,नांदेड) प्रमुख अतिथी डॉ.साईनाथ घायाळ ( अध्यक्ष, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड) डॉ.शिवानंद दास (अध्यक्ष,फाईन आणि प्री-आर्टस ) प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे, व्यासपीठावर डॉ.संगीता आवचार, डॉ.रवींद्र इंगळे, डॉ.ओमप्रभा लोहकरे, डॉ.परमेश्वर यादव , आदींची उपस्थिती होती.
स्वामी रामानंद तीर्थ आणि कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विजयराव जामकर यांनी डॉ.डी.एन. मोरे , डॉ.रोहिदास नितोंडे , डॉ.साईनाथ घायाळ, डॉ.शिवानंद दास या मान्यवरांचा सत्कार केला.प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी विजयराव जामकर यांचे स्वागत केले.या वेळी तिन्ही विषयांच्या सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी प्रास्ताविक करत कार्यशाळा घेण्याबाबत कुलगुरूंनी अनुमती दिल्याबद्दल आभार व्यक्त करत कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे प्रभावी साधन ठरावे. आज विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासारखे प्रश्न पुढ्यात असताना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारा अभ्यासक्रम जो त्याला रोजगाराची संधी देत सक्षम बनवेल असा अभ्यासक्रम देण्याचा मानस उदघाटक डॉ.रोहिदास नितोंडे यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ.साईनाथ घायाळ, डॉ.शिवानंद दास यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
नवीन शैक्षणिक धोरणा
नुसार शिक्षण देण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आज उपलब्ध नाही. प्राध्यापक भरती बाबत तसा पाठपुरावा विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे करावा.डी.एन.मोरे सरांनी मांडलेल्या विचारानुसार अभ्यास मंडळ आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान द्यावे,असे आवाहन विजयराव जामकर यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे सर्व प्रमुख व सदस्य यांचे योगदान लाभले. संगीत विभागातील डॉ. पलवी कुलकर्णी व प्रा.आश्विनी चांदमारे यांनी विभागातील कार्यशाळेचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ओमप्रभा लोहकरे यांनी केले तर डॉ रवींद्र इंगळे यांनी आभार मानले.

Share

Related posts

श्री चक्रधर स्वामी हे मानवतेचे प्रेरणास्त्रोत -प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील साळवे यांना संगणक शास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज२५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजनकार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल

Chief Editor

मालकाला सूचना न देता वृक्षतोड व नाली खोदकाम;मनपा अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

Chief Editor

Leave a Comment