एम सी आर

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Uncategorized

नांदेड : नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) वतीने आज दिनांक 05-03-2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. फड होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथील उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. के. स्वामी उपस्थित होते. त्यांनी “राष्ट्रीय विज्ञान दिन व भारतीय ज्ञान परंपरेतील विज्ञान” या विषयावर पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विज्ञान, संशोधन व नवोपक्रम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी IQAC समन्वयक डॉ. मनीष देशपांडे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत भारतीय ज्ञान परंपरेतील विज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयतील विज्ञान समन्वयक प्रा.डॉ. एम. ए. बंगार उपस्थित होत्या , राष्ट्रिय विज्ञान दिन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बी. डी. वाघमारे आणि डॉ. एस. एस. साकळे यांनी कार्यक्रम यश्वसवी होण्यासाठी प.रिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश पांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. व्ही. डी. मठपती यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

आई आणि नवजात शिशूचे प्राण वाचविण्यात अंबेकर दाम्पत्याची मोलाची भूमिका.

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये चार्ल्स बॅबेज ॲक्टिव्ह फोरम व डेनिस रिची आयटी क्लबचे दिमाखात उद्घाटन

Chief Editor

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Chief Editor

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र विभागातर्फे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment