एम सी आर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Uncategorized

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या पुढाकाराने व भारत केयर्स (SMEC ट्रस्ट) यांच्या सहकार्याने “ “गिविंग विंग्स टू फ्लाई “ या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुण महिलांना व्यावसायिक वैमानिक बनण्यासाठी मार्गदर्शन करणारी आभासी बैठक दी.०१ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत भारत केयर्सचे संसाधन व्याख्याते कालपेश मोहोड यांनी वैमानिक क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण प्रक्रिया, आवश्यक पात्रता, करिअरच्या विविध संधी तसेच व्यावसायिक वैमानिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना या क्षेत्राकडे आत्मविश्वासाने पाहण्याचे आवाहन केले.

सदर उपक्रमामध्ये १८ ते ३५ वयोगटातील भारतीय महिलांसाठी व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रशिक्षणामध्ये कमर्शियल पायलट लायसन्स (CPL), ATR टाईप रेटिंग प्रशिक्षण, निवड प्रक्रियेसाठी प्रवास व निवास खर्च, वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

या आभासी बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, स्त्री अध्ययन केंद्राच्या केंद्र प्रमुख डॉ. शालिनी कदम, भारत केयर्सचे भगवान बिदाराकोटे, मानसी दीवान तसेच दत्ता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यानी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समन्वय विद्यार्थी विकास विभागामार्फत करण्यात आले. बैठकीचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले. त्यांनी भारत केयर्सच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Share

Related posts

लोणी (खु.) येथे दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांचे पुण्यस्मरण रक्तदान,धम्मदेसना, भोजनदानासह समाजप्रबोधनातून अभिवादन;ॲड.यदुपत देशमुख यांचा नागरी सत्कार

Chief Editor

महाराष्ट्रात 3 दिवस दुखवटा…. सुट्टी जाहीर

Chief Editor

उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ कवितासंग्रहाचा ४ ऑक्टोबरला प्रकाशन सोहळा

Chief Editor

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनसाठी कृतिशील उपक्रम

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड.ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

Leave a Comment