आरोग्य व शिक्षण

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप

नांदेड दि :(संपादक राज गायकवाड) येथील एम जी एम’स कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आई. टी. नांदेड व इंदिरा गांधी महाविद्यालय, नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दि २९/०२/२४ ते ०६/०३/२४ या कालावधीत मौजे वरखेड येथे आयोजित केलेल्या ७ दिवसीय शिबिराचा समारोप दि ०६/०३/२४ रोजी झाला.
या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नरेंद्र दादा चव्हाण हे होते. या वेळी स्वा. रा .ती .म. विद्यापीठाचे रासेयो चे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगि, इ.गा. म. चे प्राचार्य राजेंद्र माळी, एम जी एम’स कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आई. टी. नांदेड च्या उपप्राचार्या डॉ. कांचन देशमुख, चंपतराव सूर्यवंशी, चंदू घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या समारोप प्रसंगी बोलतांना डॉ. मल्लिकार्जुन करजगि यांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले व सर्व स्वयंसेवकांना जलदूत होण्याचा आग्रह केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नरेंद्र दादा चव्हाण यांनी स्वयंसेवकांना तुम्ही देशाचे आधारस्तम्भ असल्याची जाणीव करून दिली व लोकशाहीत मतदानाचे महत्व व योग्य प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्वयंसेवकांना विशेष कला कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या ७ दिवसीय समारोप शिबिराचे सूत्रसंचालन रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ . भागवत पास्तापुरे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी दोन्ही महाविद्यालयाचे रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ सुनील डहाळे, डॉ विशाल मस्के, रासेयो चे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशांत बोलवार यांनी केले व शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.