https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

महिलांचे भावनिक व मानसिक स्तरावर सबलीकरण व्हावे -उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम

*
नांदेड:(दि.९ मार्च २०२४)
शासनस्तरावर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात योजना कार्यान्वित आहेत; मात्र तळागाळातील महिलांपर्यंत त्या योजना पोहोचणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण तर व्हावेच; मात्र भावनिक, मानसिक, वैचारिक व निर्णय क्षमतेच्या स्तरावर देखील त्या सक्षम व्हाव्यात. तेव्हाच स्त्रियांचे प्रश्न सुटतील. स्त्री ही देशाच्या उज्वल संस्कृतीची वाहक आहे. समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. तिला माणूस म्हणून दर्जा व वागणूक मिळाली पाहिजे; असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिला सुरक्षा व सुधार समिती, मेडिकल एड सेंटर आणि प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘महिला सबलीकरण’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे, डॉ.मंगल कदम, डॉ.धनराज भुरे, प्रा.राजश्री भोपाळे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, स्त्री- पुरुष समता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आजही जगामध्ये महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण ६० टक्के आहे. आज भारतामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या केवळ बारा टक्के आहे; तसेच पीएच.डी. संशोधन करणाऱ्यांची संख्या केवळ ४.७% आहे. महिला सक्षमीकरणासाठी या संख्येमध्ये वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे श्रेय महिलांकडे जाते. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कायद्याचा उपयोग महिलांनी घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात, आज प्रत्येक क्षेत्रातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. संधी म्हणजेच प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व दिल्याशिवाय योग्यता व गुणवत्ता सिद्ध करता येणार नाही. मानसिकता बदलल्याशिवाय हे परिवर्तन होणार नाही, असे विचार व्यक्त केले.
डॉ.संजय ननवरे यांचे विषयानुरूप यथोचित भाषण झाले.
यावेळी रक्तगट चाचणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. मौर्या पॅथॉलॉजी लॅब येथील रवीना राम घाटोळ आणि काजल पवार यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.मंगल कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री भोपाळे यांनी केले तसेच शेवटी आभार देखील मानले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.नीताराणी जयस्वाल यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राणिशास्त्र विभागातील प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.एस.डी. माने, महिला सुरक्षा व सुधार समितीच्या सदस्या डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ.अंजली जाधव, डॉ. अर्चना गिरडे, प्रा.सोनाली वाकोडे, मेडिकल एड सेंटरचे सदस्य डॉ.राजकुमार सोनवणे, प्रा.एस.बी.राऊत, प्रा.एस.एस.मावसकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमास डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.मीरा फड, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ. कविता केंद्रे, डॉ.दीप्ती तोटावार आदी प्राध्यापकांसह, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704