गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा व अहेरी या दोन ठिकाणावरील रिले केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार आहे.
देशात एकाच वेळी 91 एफ एम केंद्र व रिले केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यात आपल्या गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा व अहेरी या दोन ठिकाणावरील रिले केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमामुळे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री मोदी यांच्या मन की बात चा 100 वा भाग रेडीओच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहे.
या रिले केंद्राचा फायदा जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्राच्या बातम्यांच्या व कार्यक्रमांच्या चाहत्यांना होणार असुन कोणत्याही एंटीना शिवाय रेडीओ सेटवर तसेच मोबाईलवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन प्रसारीत होणारे विविध भारतीचे कार्यक्रम सुरळीत एकावयास मिळणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, आमदार व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.