विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील मार्कडेश्वर मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे बाधकाम तत्काळ पुर्ण करावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते संतोष सुरपाम यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुण मलीक यांची कार्यालयात भेट घेऊन निवेदनातुन मागणी केली आहे.
निवेदनात संतोष सुरपाम म्हटले कि, विदर्भाची काशी म्हणून नावालौकीकास असलेल्या मार्कंडादेव येथील मुख्य मंदिराचे जिर्णेधाराचे काम गेल्या कित्येक दिवसापासून सुरु असुन आजतागायत पुर्ण होऊ शकले नाही ते अपुर्ण असणारे बांधकाम तत्काळ पुर्ण करावे. या भेटी दरम्यान अधिक्षक अरुण मलीक म्हणाले कि, काही दिवसातच मार्कंडादेव येथील अपुर्ण असणाऱ्या मंदिराचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे असे आश्वासन अध्यक्ष संतोष सुरपाम यांना दिले.
मार्कंडादेव येथील विकासाकरीता सर्वच स्तरावरुन प्रयत्न होण्याची गरज असुन भारतातील खजुराहो मंदिराच्या मुर्ती कला या मंदिरावर असुन जागतीक किर्ती वाढविणारे पाषाणावरील कला कृती आहे.त्यामुळे याठिकाणी भाविक भक्त,पर्यटकाकरीता विशेष सोयी सुविधा ऊपलब्ध होण्याची गरज असल्याचे मत सुरपाम यांनी व्यक्त केले आहे