दिल्ली,प्रतिनिधी :-
इयत्ता तिसर्या वर्गात शिकणाऱ्या एका मुस्लीम विद्यार्थिनीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क एक व्हिडीओ पाठवून जगभरात धमाल उडवून दिली आहे. या मुलीच्या व्हिडीओ मुळे सरकार खळबळून जागे झाले आहे. तिने मांडलेली समस्या सोडविण्यासाठी चक्क जम्मूचे शालेय शिक्षण संचालक तिची समस्या सोडविण्यासाठी धावपळ करीत आहे.
https://youtu.be/wLIf1AfYZlY
सीरत हिने तिच्या तीन खोल्यांच्या सरकारी शाळेची दुरवस्था एक व्हिडिओमधून मांडली.
यामध्ये ती म्हणते सुरवातील म्हणते, मोदी जी आप सबकी बात सुनते हो, मेरी भी बात सुन लो. देखो हमारा फर्श कितना गंदा हो गया है. हमें यहां नीचे बिठाते हैं. डेस्क भी नहीं है. शेवटी ती म्हणचे ‘कृपया मोदीजी, आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा, ना ?’
काय आहे व्हिडिओमध्ये हा व्हिडीओ बघा पुढील लिंक ला टच करा ….
व्हिडिओमध्ये शाळेची एक दुमजली इमारत दिसत आहे. तिची दुरवस्था झाली आहे. ती पाहता शाळा अर्धवट अवस्थेत बांधून सोडून दिल्याचे दिसते. मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही दिवसांनी जम्मूचे शालेय शिक्षण संचालक रविशंकर शर्मा यांनी शाळेत आले आणि काम सुरु झाले.
शाळेचे काम सुरु झाल्यानंतर दुसरा व्हिडिओमध्ये सीरत म्हणते, मोदी सरांनी यांना पाठवले. शाळेचे काम सुरु झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.
शाळेत 250 मुले या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 250 मुले शिकतात. तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या परिसराच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सांगण्यावरून 2013 ते 14 च्या दरम्यान इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर 20 लाख रुपयेही दिले. 2017 मध्ये इमारतीसाठी पुन्हा 30 लाख रुपये देण्यात आले. 2017 मध्येच काम थांबले. आता पुन्हा काम सुरु झाले आहे. सीरतने IAS अधिकारी होण्याची महत्वकांक्षा व्यक्त केली.