कृषी व व्यापार
धक्कादायक! अतुल गण्यारपवार यांना पोलीस निरीक्षकाकडून बेदम मारहाण
मतदारांना बाहेर पाठवत असल्याची होती तक्रार ?

गडचिरोली,प्रतिनिधी :-
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी बेदम मारहाण केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांनी महत्वपूर्ण राजकीय नेत्याला निवडणुकी दरम्यान बेदम मारहाण केल्याची हि पहिलीच घटना असल्याने पोलीसाबाबत तीव्र रोष निर्माण होत असून हि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हि पोलिसांच्या दहशती खाली होणार काय? हि दहशत मतदारा मध्य निर्माण झाली आहे. या बाबत आज गडचिरोली येथे त्यांचा समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन राजेश खांडवे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे वातावरण असल्याने अतुल गण्यारपवार हे मतदारांना बाहेर पाठवत असल्याची तक्रार पोलिसांकडे होती. त्यामुळे पहाटे ५ वाजताच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा या बाजार समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २० एप्रिल ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. चामोर्शीत सर्वपक्षीय विरुद्ध अतुल गण्यारपवार अशी लढत आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारांना ट्रॅव्हल्समधून एकत्रितपणे ते बाहेर पाठवित असल्याची त्यांच्याविरुद्ध तक्रार होती. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी १९ एप्रिलला वारंवार त्यांना फोन करुनही ते ठाण्यात आले नाहीत. २० रोजी पहाटे नाकाबंदीवेळी खांडवे व गण्यारपवार यांची भेट झाली. यावेळी खांडवे यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात गण्यारपवारांचा डावा हात फ्रॅक्चर असून गळ्यालाही मार आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्या कडे गण्यार्पावर यांनी लेखी तक्रार केल्याने गडचिरोली पोलिसांनी गण्यारपवार यांचा जबाब नोंदवला आहे.
मी घरी झोपून असताना पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मला वारंवार कॉल करून ठाण्यात बोलावून घेतले. ठाण्यात गेल्यावर खांडवेंनी विनाकारण शिवीगाळ करू मला बेदम मारहाण केली. माझ्या भावाचे एन्काऊंटर करू अशी धमकीही दिली.
–अतुल गण्यारपवार,माजी सभापती कृउबास चामोर्शी.