कृषी व व्यापार

थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी कोमल सावरे यांचे नगर परिषद कर्मचाऱ्यांना सक्त आदेश

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी आपल्याकडे मानवत नगर परिषदेची असलेली थकीत मालमत्ता कर, दुकान भाडे, पाणी पट्टी इतर थकबाकी कर इत्यादी कर त्वरित भरणा करूण नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.
मानवत नगर परिषदेच्या हद्दीत नागरीकाकडे कोट्यावधी रूपयाची थकबाकी असल्याने प्रशासन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असून शहरातील नागरीकांनी आपल्याकडे मानवत नगर परिषदेची विविध कर बाकी असून शहरातील नागरीकांनी , थकबाकीदार यांनी लवकरात लवकर आपली थकबाकी आज पर्यंत भरून घ्यावी अन्यथा आपले नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल व कुठल्या ही प्रकारचे म्हणणे ऐकून घेतल्या जाणार नाही मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी वसुली पथकातील कर्मचारी यांना असे सक्त तोंडी आदेश दिले आहेत.
त्या नुसार मानवत नगर पालिकेच्या वतीने विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून आज एकूण ०४ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत.
मानवत नगर परिषदेच्या वतीने ही मोहीम या पुढे चालू राहील तरी शहरातील सर्व थक बाकीदार चालू थकबाकीदार यांनी आपल्याकडे असलेला मानवत नगर परिषदेच्या सर्व कर भरणा भरून सहकार्य करावे. मानवत शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या येणाऱ्या करा मधूनच दिल्या जातात या मुळे सर्व नागरिकांनी मानवत नगर पालिकेला सहकार्य करावे नगर परिषदेचा आर्थिक कना हा कर भरणा असून या मधून लाईट बिल व सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता, सेवा, आरोग्य इत्यादी कामे होत असतात तरी सर्व नागरिकांनी आपल्या कडे असणारा कराचा भरणा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे. या विशेष मोहिमे मध्ये मानवत नगर परिषदेचे कर्मचारी संतोष उन्हाळे, अन्वर सय्यद, रामराव चव्हाण, भगवान शिंदे, राजेश शर्मा, सातभाई, रुद्रवार, शिवाजी कच्छवे ,जावेद मीर, मनमोहन बारहाते, रवी लाड, सचिन सोनवणे, पंकज पवार, एन. डी. लाड, रितेश भदर्गे, काळे आदी कर्मचारी यांचा समावेश आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.