https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

कोल्हा जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदे तात्काळ भरा.

कोल्हा ग्रामपंचायतीचे सरपंच यांची परभणी जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. कोल्हा जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदाची तात्काळ पद भरती करण्यात यावी अशी मागणी कोल्हा ग्राम पंचायतचे सरपंच यांनी एका निवेदना द्वारे परभणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिनांक १० जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोल्हा ग्राम पंचायतीचे सरपंच रामचंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. असून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मानवत तालुक्यातील कोल्हा जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त आहे शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये शाळेची पट संख्या अधिक वाढली आहे. तर शाळेची गुणवत्ता वाढविण्या साठी शिक्षकांचे रिक्त पद तात्काळ भरण्यात यावी व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर कोल्हा ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र गायकवाड, डिगांबर तारे, अर्जुन ढाकरगे, उद्धवराव भिसे पाटील , शेषराव भिसे पाटील, बब्रुवान सुरवसे, सुरेश भिसे पाटील , माणिकराव तारे पाटील , संजय मोहकरे , मुंजाभाऊ भिसे पाटील , परमेश्वर भिसे पाटील , अर्जुन भिसे पाटील ,अनुरथ राउत, सुरेश भिसे पाटील , अशोक भिसे पाटील , बाळासाहेब देशमुख, बाबासाहेब गरड, राजू मोहकरे, रामकिशन राऊत, रमेश तारे पाटील , दिनेश भिसे पाटील यांच्या सह कोल्हा ग्रामस्थांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704