https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

मानवत नगर परिषद प्रशासन यांच्या विरोधात आजचा मानवत १००% बंद यशस्वी.

मानवत नगर परिषदेने केलेली भाडेवाढ रद्द न केल्यास लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकू: अनिल जाधव.

मानवत // प्रतिनिधी.

दिनांक 05/04/2024 वार शुक्रवार रोजी मानवत नगर परिषद प्रशासनाने नियम बाह्य केलेली भाडे वाढ व प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना दिलेली तुच्छ वागणूकीमुळे मानवत शहर बंद ठेवून मानवत तहसिलचे तहसीलदार यांचे प्रतिनिधी मानवत सज्जाचे तलाठी नागरगोजे साहेब यांना निवेदन देण्यात आले. मानवत शहरातील गाळेधारक व मोकळ्या जागेतील किरायदार यांना बेसुमार नियमबाह्य भाडेवाढ केली आहे यामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.नगर परिषद प्रशासनाच्या निषेध म्हणून आज सर्व व्यापाऱ्यांनी मानवत बंद करून निषेध नोंदवला.
यावर ही भाडेवाढ रद्द् नाही झाल्यास शांततेच्या मार्गाने रास्ता रोको , साखळी उपोषण, लोकसभेच्या मतदानावर बहीष्कार , आमरण उपोषण अंदोलने करण्यात येणार आहेत याची सर्वस्वी जबाबदारी मानवत नगर परिषद प्रशासनावर राहिल या संबंधीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमूख अनिल जाधव , रामराजे महाडीक , रवी दहे , दिपक बारहाते, नगर सेवक काॅग्रेसचे शहराध्यक्ष शाम चव्हाण , अंनत भदर्गे , रहीम भाई , ॲड.विक्रमसिंह दहे , जनार्धन किर्तने , शंकर तर्टे , रवी पंडीत , चंद्रकांत मगर , जयप्रकाश मिटकरी , बंडू तुरे , गब्बर दहे , गणेश कडतन , विष्णू पवार , नारायण शिंदे , सतिष लांडे , प्रल्हाद दहे , सुरेश बनगर , माऊली दहे , शे.सत्तार , सुभाष सावंत , रमेश हाळने , विष्णू वाघमारे , शे.अमिरोद्दीन , विठ्ठल शेळके , प्रभाकर घोडके , रतन शिंदे , दिपक कुमावत , बबन हजारे , भगवान कुंभार , किसन भिसे , पप्पू सावंत , पानझाडे , नितिन हाळणे अब्दूल खालेल , कोकरे इत्यादीं.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704