प्रभात नगर येथील ड्रेनेज लाईन दुरुस्ती च्या अपुऱ्या कामामुळे नागरिकांना होते त्रास

नांदेड प्रतिनिधी दि:19 नांदेड शहरामध्ये ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे पण हे खोदकाम अनेक नगरामध्ये पूर्ण झाले नाही ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या ठिकाणची खड्डे भरण्यात आले नाही रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्यामुळे नागरिक पुरते त्रासलेले आहेत प्रभात नगर येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट सोडून महापालिकेतील लोक मात्र प्रसार झाल्याचे दिसून येत आहे प्रभात नगर मधील रहिवाशांना रस्त्याने नीट जाता येत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची वाहने सुद्धा रस्त्याने घेऊन जाता येत नाहीत दुचाकी वाहन तसेच चारचाकी वाहन रस्त्याने येजा करताना मोठी कसरत करावी लागत आहे चार चाकी वाहनांसाठी तर हा रस्ता फार अवघड झालेला आहे अनेक चारचाकी वाहनाचे चेंबर फुटून मोठे नुकसान झाले आहे येथील रस्ता दुरुस्ती कडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आधीच प्रभात नगर येथील नाल्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे तो प्रश्न सुटत नाही तर दुसरा प्रश्न तयारच आहे बघुयात येथील प्रश्नांकडे प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देते