ऑनर किलींग करणाऱ्या पाच जणांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हृदयाला पाझर फोडणारी धक्कादायक घटना घडली असून चक्क पोटच्या मुलीला दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध का ठेवले म्हणून आई वडिलांनी नातेवाइकांच्या मदतीने गळा आवळून खून केला.पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची राख नदीत टाकण्यात आली.या हृदयद्रावक घटने मुळे एकच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेऊन पुढच्यावर्षी डॉक्टर पदवी प्राप्त करण्याच्या अगदी जवळ असणाऱ्या युवतीचा खून करून पुरावा नष्ट करणारे तिचे वडील, काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ अशा पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी सहा दिवस अर्थात 3 फेबुरवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. की
याबाबत लिंबगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार: पिंपरी महिपाल येथील मयत शुभांगी जोगदंड वय (२३)ही बी. ए. एम.एस.या वैद्यकीय तृतीय वर्षात शिक्षण शिक्षण घेत होती. एका तरुणाशी तिचे प्रेम संबंध असल्याची माहिती आई-वडिलांना समजली. घरच्यांनी तिचे नातेवाईकातील दुसऱ्या युवकासोबत सोयरीक जुळली होती मात्र सदर युवतीच्या प्रेम संबंधाची माहिती त्या तरुणाला समजल्यानंतर त्याने मयत शुभांगी सोबत झालेली सोयरीक मोडली होती. यानंतर शुभांगी हिची तिच्या मित्राशी बोलणे सुरूच होती मुलीची सोयरीक मोडल्याच्या रागातून आणि समाजात होणारी बदनामी हा राग मनात धरून तिच्या आई-वडिलांनी मयत शुभांगी चा गळा आवळून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह शेतात जाळून गावाजवळील नदीत असती विसर्जन करून पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केला. शुभांगी तीन दिवसापासून बेपत्ता असल्याची गुप्त माहिती लिब गाव पोलिसांना मिळाली त्यानंतर लिंबगाव पोलिसांनी याप्रकरणी संशयावरून शुभांगी चे आई-वडील मामा दोन चुलत भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे याप्रकरणी निमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार हे करत आहेत. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.