आरोग्य व शिक्षण
सत्य साई बाबांच्या महासमाधी दिनी विविध उपक्रम
गडचिरोली,प्रतिनिधी :-
सत्य साई बाबांच्या येत्या २४ एप्रिल रोजी महासमाधी दिनी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भगवान सत्य साई बाबांचा २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात ‘आराधना दिवस’ (महासमाधी दिवस) साईभक्तांकडून विविध समाजोपयोगी उपक्रम घेऊन साजरा केला जातो.
गडचिरोली सत्य साई संघटनेकडून सुध्दा या दिवशी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक, करमटोला व मसली (वाकडी) या गावात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पहाटे ओमकार, सुप्रभात,नगरसंकिर्तन आणि संध्याकाळी साईसत्संग हॉल मध्ये भजनाचा कार्यक्रम होणार आहे.