सकल मराठा समाज* शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने मालवण प्रकरणी निषेध
मानवत / प्रतिनिधी.
ककल मराठा समाज व शिवप्रेमी नागरीक यांच्या वतीने मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे व महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्याचे वेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल अॅड सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत तहसिलचे नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
सकल मराठा समाज मानवत तालुका व शिवप्रेमी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले मालवण येथे आठ महिन्यापुर्वी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शिवरायांच्या स्मारकाचे राजकोट किल्यावर लोकार्पण करण्यात आले होते.
आणि या स्मारकास एकुण तिन हजार सहाशे कोटी रुपये खर्च झाला आहे. सदरील स्मारकाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच सदरील स्मारकाचे लोकसभा निवडणुकपुर्वी याचे लोकार्पण व्हावे या उद्देशाने घाई- गडबडीने महाराष्ट्र शासनाने राजकीय हस्तक्षेप करुन निकृष्ट दर्जाचे सामान वापरुन कमी कालावधीमध्ये स्मारक उभारण्यात आले आणि सदरील शिवरायांचे स्मारक हे निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे स्मारक पडले आणि महाराष्ट्र शासनाचे जबाबदार मंत्री हे बेजबाबदार वक्तव्य करुन स्मारकाची जबाबदारी हे नौदलावर ढकलत आहे. म्हणुन सकल मराठा समाज मानवत तालुका व शिवप्रेमी यांच्या वतीने झालेल्या घटनेचा जाहीर निषेध अॅड, सुनिल जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाले करण्यात आला यावेळी मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज जाधव, अॅड, संतोषराव लाडाणे, संचालक सुरज काकडे , वैजनाथ महिपाल, भगवान कदम, अनंतराव यादव, प्रताप लाडाणे , नारायण भिसे, अमोल कदम, रामेश्वर काळे, संतोष लाडाणे , माऊली चांगभले पाटील, दत्तराव जाधव, योगेश जाधव , अॅड, गणेश धोपटे, अॅड, मोहन बारहात्ते, अॅड, रावसाहेब हाळणे, करण निर्वळ, गोविंद घांडगे, माणिक धोपटे, अनंत यादव , भगवान कदम, अनिल निर्वळ, प्रताप पिंपळे, गजानन ऊक्कलकर, शुभम अवचार आदी सह शेकडो सकल मराठा समाज बांधव व शिवप्रेमी नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**