ताज्या घडामोडी

संशोधनाद्वारे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान -माजी प्र- कुलगुरू डॉ.माधुरी देशपांडे

नांदेड:(दि.२७ ऑगस्ट २०२४)
संशोधन हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे तत्व आहे. संशोधनानंतर अध्ययन, अध्यापन, समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांसोबत सुसंवादामध्ये आमुलाग्र बदल घडत असतो. अमेरिकेमध्ये ८० टक्के उद्योगक्षेत्र हे संशोधनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. संशोधनाद्वारे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देता येते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात संशोधन प्रोत्साहन आणि नाविन्यपूर्ण निष्कर्ष समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने ‘संशोधन प्रकल्पाची संरचना: संशोधन निधीची तंत्रे’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये त्या बोलत होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.संजय ननवरे, प्रा.माधव दुधाटे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, कोणतेही संशोधन हे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी किती उपयोगाचे आहे, हा प्रश्न संशोधकाने संशोधन कार्यात केंद्रबिंदू ठेवावा. पेटंटचे सर्वसामान्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असते. त्यासाठी संशोधन प्रकल्प कसा तयार करावा, कसा लिहावा, याचे ज्ञान संशोधकाला असणे उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.संजय ननवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माधव दुधाटे यांनी केले आणि आभार डॉ. एम. एम.व्ही.बेग यांनी मानले.
शेवटी प्रश्नोत्तर सत्रात प्रा.प्रियंका सिसोदिया आणि डॉ. साईनाथ बिंदगे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.विजय भोसले, डॉ.मदन अंभोरे, डॉ. ए.एस.कुवर, प्रा.पी.आर.चिकटे, प्रा.नारायण गव्हाणे, डॉ. अर्जुन गुरखुदे, डॉ.योगेश नकाते, प्रा.एस बी राऊत, डॉ.सविता वानखेडे, प्रा.साहेब माने, डॉ. एस. एस.राठोड, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ. बी.बालाजीराव, डॉ.धनराज भुरे, डॉ. रमेश चिल्लावार, डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.अजय मुठे, डॉ.नीरज पांडे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.सुभाष जुन्ने डॉ.साहेब शिंदे, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.कैलास इंगोले, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.दिगंबर भोसले, प्रा. भारती सुवर्णकार यांनी परिश्रम घेतले तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, परशुराम जाधव आणि डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.