ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर तालूकास्तरीय खो,खो स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन.

मानवत / प्रतिनिधी.

तालुास्तरीय खोखो स्पर्धा नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या
दिनांक 27/8/2024 रोजी नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उप मुख्याध्यापक श्री.उद्धवराव हरकाळ सर प्रमुख पाहुणे म्हणून के.के.एम कॉलेज चे प्रा.पवन बारहाते, शिवराज नाईक सर श्री.मुंजाजी गवारे ( न.प.मानवत) तालुका संयोजक श्री किशन भिसे सर, श्री.गोपाळ मंत्री, पर्यवेक्षक श्री व्ही.पी. बुधवंत सर पर्यवेक्षक श्री संजय लाड श्री. माणिकराव शिसोदे सर श्री.संजय जाधव सर श्रीमती कनकुटे के.डी. मॅडम प्रा.श्री.आघाव सर के के एम कॉलेज मानवत. यांची प्रमुख उपस्थिती होती खो-खो स्पर्धचे उद्घाटन प्रा.पवन बारहाते यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मागील दहा वर्षांपासून शाळेच्या मैदानावर खो-खो हे खेळ घेतले जातात तोच वारसा पुढे प्रा.श्री पवन बारहाते सर यांनी कॉलेज मध्ये चालवला आहे तो आज ही नेताजी सुभाष विद्यालयात कायम आहे. स्पर्धेचे अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे. 14 वर्ष मुले- प्रथम क्रमांक एस.एस.के.के. विद्यालय मानवत द्वितीय क्रमांक नेताजी सुभाष मा.व उच्च मा. विद्यालय मानवत*
14 वर्ष मुली- प्रथमक्रमांक- ज्ञानोपासक विद्यालय,रामेटाकळी*
द्वितीय क्रमांक-एस एस के. व्ही. मानवत*
*17 वर्ष मुले वयोगट- प्रथम क्रमांक- नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानवत.द्वितीय क्रमांक- सरदार वल्लभाई पटेल ज्ञा न नमंदिर मानोली.*
*17 वर्ष वयोगट- प्रथम क्रमांक-ज्ञानोपासक विद्यालय,रामेटाकळी*
*द्वितीय क्रमांक-एस. एस के.व्ही मानवत*
*स्पर्धा यशस्वी घेण्यासाठी पंच म्हणून पंकज पवार, शुभम जाधव,ओंकार बारहाते, हरी भाऊ मोगरे, रुपेश लेंगुळे, शेषेराव खटिंग, अशोक धर्मे,लखन चव्हाण,श्री रेंगे सर,श्री.ठोमरे सर श्री गोविंद जोशी सर,श्री *पवन कचरे,गजानन बालटकर द्यानेश्वर कावळे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री अशोक काळे सर श्री गरुड सर,श्री. सारडा सर श्री बंडू लाड,श्री राजू सूर्यवंशी यांनी विशेष असे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री.व्ही.पी.बुधवंत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री माणिक शिसोदे सर यांनी केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.