ताज्या घडामोडी

लेखिका माया भद्रे यांच्या पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

नांदेड, (प्रतिनिधी)-येथील गुजराती प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका लेखिका माया भद्रे यांच्या ‘ज्ञानपराग’ आणि ‘गुज मनीचे’ या दोन पुस्तकांचा नांदेड येथे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आयटीआय नजीकच्या कामगार कल्याण केंद्रामधील शुभारंभ मंगल कार्यालयात उद्या दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे माजी शिक्षण संचालक प्रसिद्ध विचारवंत गोविंद नांदेडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा होणार पडणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. आदर्श गुरुजनांच्या संस्कारांचे ‘ज्ञानपराग ‘ हा शालेय जीवनातील शिक्षकांच्या शिक्षकांचा गौरवास्पद ग्रंथ आणि ‘गुज मनीचे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव विकास तु. कदम गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन भाई नागडा, उमरी रेल्वे स्टेशन येथील नूतन विद्यालयाचे संचालक शिरीष गोरठेकर आणि सेवानिवृत्त सहशिक्षिका विमलताई अमृतराव भद्रे यांची यावेळी उपस्थिती विशेष उपस्थिती राहणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, प्रसिद्ध लेखिका डॉ. करूणा जमदाडे आणि ज्येष्ठ नाट्य लेखक दिग्दर्शक कवी डॉ. विलासराज भद्रे हे विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार कुलदीप नंदुरकर करणार आहेत. या कार्यक्रमात गुरुवर्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘गझल- ए -इलाही’ ही संगीत मेजवानी रसिकांना देण्यात येणार आहे.
लेखिका माया भद्रे यांच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन बी. के. कांबळे, शैलेंद्र चौदंते, नागसेन चौदंते, विक्रांत कांबळे, राजकिरण कांबळे आदींनी केले आहे. नांदेडच्या निर्मल प्रकाशनाचे प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी ही पुस्तके प्रकाशनासाठी सिद्ध केली आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.