हुतात्मा पानसरे महाविद्यालय भरती प्रकरण शिक्षणाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे मागविला अहवाल
नांदेड दि २५ : हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कुंडलवाडी संचलित हु.पानसरे महाविद्यालयातील भरती प्रकरण सद्या भलतेच गाजत असुन अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे या भरती प्रकरणात बेकायदेशीर संचालक मंडळाकडून होणाऱ्या प्रक्रियेबाबत नांदेडच्या सहायक धर्मादाय आयुक्तांना एका पत्राद्वारे नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकृतेबाबत अहवाल मागविला आहे.
कुंडलवाडी येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हु.पानसरे महाविद्यालयात सद्या पवित्र पोर्टल व्दारे भरतीसाठी दि.२१/२२/आणि २३ रोजी मुलाखती झाल्या आहेत यावर अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांनी संबंधितांकडे तक्रार केली होती,त्याची दखल घेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच नांदेडच्या माध्यमिक शिक्षण विभागाने हि कार्यवाही योग्य पध्दतीने करावी यासाठी १०सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सिध्दार्थ तलवारे यांनी दिला आहे