आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अर्जापुरच्या हुतात्मा पानसरे महाविद्यालयातील भरतीसाठीच्या मुलाखती तात्काळ रद्द करा: अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांची विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे मागणी

नांदेड दि.(संपादक राज गायकवाड): हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कुंडलवाडी संचलित हुतात्मा पानसरे महाविद्यालयात पवित्र पोर्टल व्दारे भरतीसाठी २१ ऑगस्ट पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत.संस्थेच्या बेकायदेशीर संचालक मंडळाकडून मुलाखती पुर्वीच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची उघड चर्चा सुरू आहे, त्यामुळे या मुलाखती तात्काळ थांबविण्याची मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक तथा जेष्ठ कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांच्या कडे केली असून, मुलाखती रद्द न केल्यास १०सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ही तलवारे यांनी दिला आहे.
तलवारे यांनी निवेदनात म्हटले आहे की संस्थेच्या संचालक मंडळाविरूध्द सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण सुरू आहे त्यावर अद्याप कसलाही निर्णय झाला नाही तरी देखील संस्थेचे सचिव आणि काही संचालक मनमानी कारभार करीत आहेत या विषयी अनेक वेळा आवाज उठविण्यात आलेला आहे आता २१ऑगष्ट पासून होणाऱ्या मुलाखती हा निव्वळ फार्स आहे, अगोदरच आर्थिक व्यवहारातुन *फिक्सिंग* झाली असून संचालक मंडळातच पैशाच्या वाटणी साठी वाद सुरू असल्याचे परिसरात सर्वत्र बोलले जात आहे त्यामुळे हुतात्म्यांच्या नावे असलेल्या महाविद्यालयाची बदनामी होवु नये व बेकायदेशीर संचालक मंडळाकडून गैरप्रकार होवू नये म्हणून मुलाखती रद्द करण्याची मागणी सिध्दार्थ तलवारे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे केली आहे या मागणीसाठी १०सप्टेंबर‌पासुन आमरण उपोषणाचा इशारा ही त्यांनी दिला आहे.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.