ताज्या घडामोडी

जालना वंदे भारत एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड पर्यंत विस्तारीत

नांदेड:दि:१० जुलै २०२५
भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.

या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार हजूर साहिब नांदेड पर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारित गाडीचे उद्घाटन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल.

या विस्तारित गाडीची नियमित सेवा दिनांक 27 ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि दिनांक 28 ऑगस्ट पासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी सुरु होईल.

गाडी संख्या 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस:

हि गाडी दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी 13.10 वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री 22.50 वाजता पोहोचेल.

गाडी संख्या 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस:

हि गाडी दिनांक 28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 14.25 वाजता पोहोचेल.

ही गाडी हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ज्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत.
सोबत – वेळापत्रक

आदरणीय संपादक साहेबांना विनंती आहे हि बातमी आपल्या प्रतिष्ठित वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.