डॉ. विठ्ठल पावडे यांचा विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा निवेदन देऊन केली मागणी

नांदेड/प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अद्यापही नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्यात आले नाहीत. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना तत्काळ शालेय गणवेश वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
15 जून रोजी महाराष्ट्र राज्यातील शाळा सुरू झाल्या. शासनाच्या धोरणानुसार शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जवळपास 45 लाख विद्यार्थी असून नांदेड जिल्ह्यामध्ये 1 लक्ष 84 हजार विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अद्यापही विद्यार्थ्यांस गणवेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. 25 जून रोजी निवेदन देऊन गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आता राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसकर यांच्याकडे निवेदन मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना गणवेश नसल्यामुळे शाळेची शिस्त बिघडत आहेत. गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरीत गणवेश उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेत गणवेशाचा कपडाच नाही
गणवेशासंदर्भात नांदेड जिल्हा परिषदेत चौकशी केली असता अजूनही कपडाच उपलब्ध झाला नाही. सदर गणवेश महिला बचत गटाच्या शिलाई करून उपलब्ध करून दिला जाणार आहे. गणवेशाच्या कपडाच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी एक महिना लागणार आहे. ही बाब चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी व्यक्त केले.