ताज्या घडामोडी

सालगडी कसबे यांच्या तक्रारी वरून मानवत पो.स्टे. मध्ये उगले यांच्या विरोधात भादवी कलम २९४/३२३/३२४/३४१/५०६/३४/ प्रमाणे गून्हा दाखल*

मानवत / प्रतिनिधी

तालुक्यातील ईटाळी या गावातील चौघांनी शेत धुऱ्याच्या वादातून बाजूच्या सालगड्यास काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक २० जूनच्या सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील उक्कलगाव येथील विजय सोपानराव कसबे हा त्यांच्या गावाच्या बाजूला असलेल्या ईटाळी शिवारातील *मालक हरिभाऊ काळे* यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून कामाला आहे.
त्यांचे मालक हरिभाऊ काळे यांच्याशी त्यांच्या बाजूला शेत असलेले *बालू उगले* व त्यांच्या भावासोबत शेत धुऱ्याचा वाद बऱ्याच दिवसांपासून आहे. याच वादात २० जून रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान सालगडी *विजय कसबे* हे मालकाच्या शेतातील दूध वाघाळा येथील दूध डेअरीवर नेऊन देण्यासाठी जात असताना रस्त्यातच *बालू उगले, गजानन उगले, कैलास उगले, हनुमान उगले* या चार जणांनी त्यांना
रस्त्यावर आडविले.’ तू हरिभाऊ यांच्या
शेतात काम करू नकोस, त्याच्या कामाला राहू नको, काम सोड’ असे म्हणून त्याच्या सोबत वाद घालू लागले. तेव्हा विजय कसबे यांनी मला कामाची गरज आहे, मी काम सोडणार नाही असे म्हणताच चौघांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील हनुमान उगले यांनी त्यांच्याजवळ असलेल्या काठीने विजय
कसबे यांच्या डोक्यात मारून गंभीर
दुखापत केली. तसेच तिथे कामाला
राहिल्यावर तुला सोडणार नाही, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत ते निघून गेले. डोक्यात जबर मार लागल्याने दूध घेऊन जाणाऱ्या मोटरसायकल वरूनच विजय कसबे हे मानवत पोलीस
ठाण्यात आले.
मानवत पोलीस ठाण्यात विजय कसबे यांच्या तक्रारीवरून ईटाळी येथील चौघांवर भादंविचे कलम ३२४,३४१, ३२३,२९४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.