ताज्या घडामोडी

कोल्हा-कोथळा-राजूरा, रस्ता मजबूतीकरणाचे डाॅ. प्राचार्य रामचंद्र भिसे यांच्याहस्ते श्रीफळ फोडून प्रारंभ

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार सुरेशराव वरपूडकर साहेब यांच्या प्रयत्नातून आज कोल्हा-कोथळा-राजूरा हा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.
या कामाची आज सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी शासनाकडे सातत्य पूर्ण पाठपूराव्यातून कोल्हा सर्कल मधील दहा गावाचा वाहतूक प्रश्न सुटणार आहे.
आज रस्ता मजबूतीकरण कामाचे डाॅ. प्राचार्य रामचंद्र भिसे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रारंभ करण्यात आले. यावेळी मनोज भिसे,संरपच रामचंद्र गायकवाड, मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आंबादासराव तुपसमूदे, मा. उपसभापती शिवाजीराव हिंगे, उपसरपंच परमेश्वर निर्वळ,दत्तात्रय कोरडे,भास्कर शिंदे, अनुरथ भिसे, सुंदर ऐडके, खंडोजी ढवळे, विश्वनाथ भिसे, दत्तराव भिसे, राधाभाऊ निर्बळ, दत्तराव पाते, लक्ष्मण आरसाड आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.