ताज्या घडामोडी

युवकांनी मजबुत मनःस्थितीने सकारात्मक जीवन जगावे – प्रा . डॉ . माधव रोडे

मानवत :दिनांक २४ सप्टेंबर रोजी के .के .एम .महाविद्यालयाच्या सभागृहा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे भौतीकशास्त्र विषयाचे प्रा डॉ .माधव रोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा .माधव रोडे म्हणाले तरूण युवक हा राष्ट्राचा प्राण आहेत, त्यांनी सकारात्मक सृष्टी, दृष्टी, वृत्तीतून आपली मन: स्थिती मजबुत करून परिस्थिती बदलावी. तर युवकांनी नींद, अहम्, वहम् यातून लवकर जागे होऊन स्वतःतील बलस्थाने ओळखावी, मोठं व्हायला ओळख लागत नाही, माणसाचे मन जिंकावी लागतात, माणुसकी जपावी लागते, आई जन्नत असते तर बाप साया हे लक्षात ठेवावे . पर्यावरणसह मानवी मुल्यांचं संवर्धन करावे.
या आधुनिक युगामध्ये आधुनिक साधनांचा वाढता वापर यामुळे मानवी मूल्यांचे हनन होत आहे .
त्या कारणामुळे अशा साधनांचा वापर मर्यादित करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला .आधुनिक साधनांमुळे मानवी जीवनाच्या जिवंतपणाचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा.डॉ माधव रोडे यांनी आपल्या विनोदी शैलीतून व इतिहासा मधील महापुरुषाचा संदर्भ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श मूल्याचे महत्त्व पोवाडाच्या साह्याने विद्यार्थ्यां समोर प्रभावी पणे सादर केले . अभिनय व पोवाडयाच्या साह्याने सहज सोप्या व विनोदी भाषेत प्रबोधन पर बहुमोल असे मानवी मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . भास्कर मुंडे प्रमुख अतिथी डॉ . मिलिंद सोनकांबळे (महिला महाविद्यालय परळी ) के.के.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . किशोर हुगे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष शिंदे उपस्थित होते,कार्यक्रमाधिकारी डॉ .सुनिता कुकडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
तर डॉ . सत्यनारायण राठी यांनी यावेळी सर्व उपस्थित मान्यवरासह पाहूण्याचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूल्य समितीचे प्रमुख आणि एन. एस. एस.नोडल ऑफिस,डॉ . पंडीत लांडगे , प्रा.भागवत मोरे , प्रा. विनायक चोपडे ,श्रीमती डॉ सारीका सावंत , श्रीमती शारदा कच्छवे यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले या वेळि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.