ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील डॉ.एम.एम.व्ही.बेग यांना पेटंट प्राप्त

*’
नांदेड:(दि.२६ सप्टेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्रोफेसर व जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.एम.एम.व्ही. बेग यांना ‘मेथड ऑफ प्रीपरेशन ऑफ क्रॉप बायोस्टीम्युलंट फ्रॉम लुसेरने प्लांट एक्सट्रॅक्ट’ या नावाचे वनस्पतीशास्त्रातील पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.
संशोधन क्षेत्रातील या बहुमानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी डॉ.बेग यांचा यथोचित सत्कार केला आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रत्येक प्राध्यापकाची वाटचाल पेटंट प्राप्तीच्या दिशेने व्हावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.एच.एल. तमलुरकर, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.आमेर खान, डॉ.राठोड, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, बालाजी देशमुख, जगन्नाथ महामुने, नवनाथ धुमाळ, सचिन धरणे, रंगनाथ जाधव, साई मोरे, सौ.मनीषा बाचोटीकर, श्याम पाटील, सोपान पुयड यांची उपस्थिती होती.
या सुयशाबद्दल डॉ. बेग यांचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.एस. बोडके, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमारानी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, डॉ. सुरेश तेलंग, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ. अंजली जाधव, डॉ.सविता वानखेडे, प्रा.प्रियंका धोपटे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.