ताज्या घडामोडी

व्यक्तिमत्व विकासामुळे आत्मविश्वास वाढतो… प्र. प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी

नांदेड:
अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘कौशल्य व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर आधारित पंधरा दिवशीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे, भाषा प्रयोग शाळा समन्वयक डॉ. इर्शाद खाण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संदीप काळे, डॉ. एस. जी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात बोलत असताना व्यक्तिमत्व उत्तम असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, सकारात्मकता आणि दयाळूपणा यासारख्या सर्व गुणांचा समावेश होतो. हे गुण वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात उपयोगी ठरतात. उत्तम व्यक्तिमत्त्वासह तुम्ही इतरांना सकारात्मक पद्धतीने प्रभावित करू शकता. व्यक्तिमत्व विकसित करणे इतके सोपे नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा निश्चित फायदा होईल असा आशावाद व्यक्त करून भविष्यात देखील अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या आयोजन करावे असा सल्ला दिला. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे यांनी बोलत असताना व्यक्तिमत्व जिंकण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणणे सर्वात महत्वाचे आहे असे नमूद करून सकारात्मक दृष्टीकोन लोकांना आकर्षित करतो आणि त्यामुळे तुमचे नाते वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारते. सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी, जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचार टाळा असा सल्ला देत अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संदीप काळे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गीता भोजणे, मयूर विष्णुपुरीकर, संभाजी तोटरे, यासेर शेख आदींनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.