ताज्या घडामोडी

आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा यशवंत महाविद्यालय येथे संपन्न

नांदेड: प्रतिनिधी
दि.२१ ते २२ सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन पुरुष/ महिला बास्केटबॉल स्पर्धा यशवंत महाविद्यालयाच्या अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ( बंदिस्त) मैदानावर पार पडल्या सर्वप्रथम स्वामी रामानंद तीर्थ व नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी/ खेळाडू कै. नरेश पैंजणे यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात सरांनी सर्व खेळाडूंना मौलिक मार्गदर्शन करुण शुभेच्छा दिल्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी स्पर्धा निवड समितीचे प्रमुख डॉ. बालाजी जाधव, सदस्य डॉ. मनोज पैंजणे, डॉ. विक्रम कुंटुरवार, डॉ, महेश वाकरडकर, नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. जयदिप कहाळेकर पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्या नंतर लागलीच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली एका पेक्षा एक सरस संघ या स्पर्धेत सहभागी असल्याचे बास्केटबॉल प्रेमी व प्रेक्षक अतिशय रोमांचित होऊन सामन्यांचा आनंद घेत होते अनेक वर्षापासून बलाढ्य संघ म्हणून परिचीत असलेल्या श्री गुरु गोविंद अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सायन्स महाविद्यालय या उभय संघात पुरुषांचा अंतिम सामना रंगला आणि अटीतटीच्या सामन्यात सायन्स महाविद्यालय संघाने विजय मिळवत विजेतेपदाचा मान मिळवला महिलांमधून वसंतराव नाईक महाविद्यालयाचा संघाने जेतेपद पटकावले एकूणच स्पर्धेत पंचांची कामगिरी पारदर्शी पद्धतीने झाल्याने स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून डॉ. जयदिप कहाळेकर. डॉ. विष्णु शिंदे, जयपाल गजभारे. म. अन्वर, डॉ. गजानन कदम, डॉ, राहुल सरोदे डॉ, किरण येतावार, राजू राऊत, अशोक हनवते आदींनी काम पाहिले

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.