ताज्या घडामोडी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शहर शाखेकडून नेताजी सुभाष विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लाड यांचा सत्कार

*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या मूख्याध्यापकपदी संजय लाड यांची नूकतीच माध्यमिक शिक्षण विभागाने विद्यालयाच्या मूख्याध्यापकपदी निवड केली याचे औचित्य साधून आज परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शहर शाखेच्या वतीने शाखा व्यवस्थापक निळकंठ हरगूडे मामा यांच्या मार्गदर्शनाखाले सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की,
आज मानवत येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखाधिकारी मदनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाले तसेच शहर शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री, निळकंठराव हरगुडे मामा बॅकेचे कॅशियर परमेश्वर चौखट , सहकारी कर्मचारी राधाताई दाभाडे यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शहर शाखेमध्ये मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक संजय लाड यांचा बँकेच्या वतीने सह ह्यदय सत्कार करण्यात आला.
यावेळी बॅकेतील कर्मचारी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.