ताज्या घडामोडी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर चर्मकार समाजाचा प्रचंड मोर्चाचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

राज्यातील चर्मकार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक ०१ आॅक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता प्रचंड मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. बबनराव घोलप (नाना ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व काना कोपऱ्यातून चर्मकार समाज बांधव उपस्थित राहणार आहेत
चर्मकार समाजाच्या मागणीसाठी वेळोवेळी प्रयत्न करून त्याची अमल बजावणी होत नसल्यामुळे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे
मागण्या- १) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणे माफ करण्यात यावे २) संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी शंभर एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावा ३) संत रविदास कौशल्य विकास बार्टी प्रमाणे सुरू करून भारतीच्या धर्तीवर स्वातंत्रपणे केंद्र सुरू करण्यात यावी ४) संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी ५) संत रोहिदास चर्मोद्योग व आर्थिक चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे ६) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला मुंबई येथे प्रशस्त असे मुख्य कार्यालय देण्यात यावे ७) चर्मकार समाजाचा आयोग सुरू करून त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा ८) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कर्ज प्रकरणासाठी असलेल्या ज्याच्याकडे रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी ९) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रलंबित असलेले सर्व कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे १०) संत रोहिदास शर्मा उद्योग व चर्मकार विकास महामंडळाला प्रत्येक जिल्ह्यात अद्यावत असे कार्यालय देऊन जिल्हा व्यवस्थापक व कर्मचारी यांची भरती करण्यात यावी मुंबई सह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावे १०) राज्यातील गटई कामगारांना गटई स्टॉलचे त्वरित वाटप करण्यात यावे ११) चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी १२) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रविदास भावना साठी जागा उपलब्ध करून भवन बांधून देण्यात यावे १३) दोन लाखा पर्यंत ची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावे १४) संत रोहिदास विकास महामंडळाच्या कर्जाच्या जामीनदार यांचा बाबत जाचक अटी रद्द कराव्यात १५) शैक्षणिक कर्ज प्रकरणे तात्कालीत निकाली काढण्यात यावे १६) राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजाच्या सामाजिक आर्थिक उद्योग विकासासाठी गेल्या 28 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रात कार्यरत आहे तरी या राज्य महासंघासाठी मुंबई येथे कार्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी १७) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची दुकाने प्रत्येक जिल्ह्यात असावी जेणेकरून महामंडळाने बनविलेला माल विकता येईल सदरील मागण्या मंजूर करण्यासाठी महाराष्ट्रातील व परभणी जिल्ह्यातील सर्व चर्मकार समाज बांधवांनी या मोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.डी.ठोंबरे,राज्यउपाध्यक्ष नरहरी सोनवणे, मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे,परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, विनोद आसोरे, सचिव एम.जी. शेवाळे यांनी केले आहे,
***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.