ताज्या घडामोडी

प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत दैदिप्यमान यश

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत 54 किलो वजनी गटात पृथ्वीराज सिंग राठोड या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले व 74 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरसिंग ठाकूर यांनी रौप्य पदक प्राप्त केले.यावेळी सोबत संघ व्यवस्थापक म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ.दीपक वाघमारे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. के. स्वामी , डॉ. संदीप शिंदे डॉ. संजय हापगुंडे,डॉ. रवींद्र लाठकर,डॉ. श्रीमंत राऊत,डॉ. राहुल वरवंटीकर,डॉ.पी. निळकंठराव , डॉ. मारोती लुटे,प्रा. व्हि.डि.जाधव, कार्यालयीन अधीक्षक श्री.राजेश अय्यंगार यांनी खेळाडूचे कौतुक केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.