ताज्या घडामोडी

भारतीय बौध्द महासभा महिला शहर शाखेच्या अध्यक्षपदी मंगलबाई जावळे यांची सर्वानूमते निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहर शाखा स्थापना ” द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालूका शाखा मानवत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात जेष्ठ पोर्णीमेचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा महिला शहर शाखेची स्थापना दिनांक २२/०६/२०२४ रोज शनिवार या दिवशी सर्वानुमते निवड करण्यात आली.
पदाधिकारी कार्यकारणी पूढील प्रमाणे अध्यक्षपदी उपासीका मंगलबाई जावळे, उपाध्यक्षा उपासीका ताईबाई साळवे, कोषाध्यक्षा उपासीका पुष्पाबाई भदर्गे, सचिव, पूजा मारोती भदर्गे.


यांची या वेळी सर्वानूमते निवड करून पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार तालूकाध्यक्ष बी. जे धबडगे, तालूका सरचिटणीस रामेश्वर एडके व तालूका उपाध्यक्ष बौध्दाचार्य नरेंद्र कांबळे व संघटक दत्ताराव तूपसमुंद्रे यांच्या हस्ते करूण त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी सारीपूत खरात, अविनाश जावळे, नितीन भदर्गे, अजय बनसोडे, रत्नदिप बोराडे, सागर पोळ व जेष्ठ उपासक हरिभाऊ घनसावंत यांनी परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील ऊपासक ऊपासीकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमास या कार्यक्रमास प्रतीसाद देऊन शाखा स्थापनेचा कार्यक्रम यशस्वी केला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.