ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना शालेय गणवेश त्वरित वितरीत करा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांची मागणी

नांदेड/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील शाळा दि. 15 जूनपासून सुरू झाल्या. तरी देखील शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार दिले जाणारे गणवेश अद्यापही वितरीत करण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना त्वरीत गणवेश वितरीत करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर त्वरीत गणवेश देण्याचे शासनाचे धोरण आहे. तरी देखील नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला नाही. दहा दिवस शाळा सुरू होऊन उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे पालन होताना दिसत नाही. तसेच शाळेच्या नियमांचेही पालन होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय देखील गणवेशाअभावी होत आहे. त्यामुळे गणवेश पुरवठा करणार्‍या पुरवठाधारकास त्वरीत आदेश देऊन जिल्हयातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात डॉ. विठ्ठल पावडे यांनी केली आहे. यावेळी सूरज पाटील शिंदे व मुकेश पटने यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.